चिपळूण : भाजपच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा १७ ऑक्टोबरला दुपारी ३ वा. शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघ येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती भाजपचे चिपळूण शहराध्यक्ष आशिष खातू यांनी दिली.

Sponsored

कृष्णा हाइट्स - कोटा

कृष्णा हाइट्स की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |

भाजपचे प्रदेश सचिव, माजी खा. निलेश राणे, कोकण विभाग संघटक शैलेंद्र दळवी, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा कार्याध्यक्ष केदार साठे, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष निलम गोंधळी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. चिपळूण पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. उमेदवारांची चाचपणी आणि प्रभागातील कार्यकर्त्यांची बांधणी सुरु आहे. भाजपने सेवा पंधरवड्यानिमित्त भाजपा प्रदेश सचिव, शहरात विविध कार्यक्रम राबवले. यातून कार्यकर्त्यांची बांधणी आणि भाजपचा प्रचार आणि प्रसार शहरात करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच चिपळूण येथे बैठक घेऊन गुहागर आणि चिपळूणमधील भाजपच्या कामाचा आढावा घेतला तसेच कार्यकर्त्यांना संघटना बांधण्यासाठी कानमंत्र दिले. या पार्श्वभूमीवर आगामी काळात भाजपने शहरामध्ये कशा पद्धतीने काम करावे, कार्यकर्त्यांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेऊन त्यांना निवडणुकीच्या दृष्टीने तयार करण्यासाठी संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे. शहरातील भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन शहराध्यक्ष आशिष खातू यांनी केले आहे.