राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शीख समुदाय सेलच्या पुणे शहर अध्यक्षपदी गुरमीतसिंग चरणसिंग गिल यांची नुकतीच निवड करण्यात आली या निवडीचे पत्र पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याकडून नुकतेच गिल यांना देण्यात आले.
या निवडीनंतर बोलताना गिल यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास पूर्ण करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहील.
तर या निवडीबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले की देशाच्या स्वातंत्र्य काळापासून ते अगदी आत्ताच्या सैन्य दलापर्यंत शीख समाजा साठीचे योगदान खूप मोठे आहे. पुणे शहरात राहणाऱ्या या शिख समाजातील नागरिकांच्या एक जुटीसाठी, समाजासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यासाठी व शीख समुदायातील नागरिकांच्या अडी -अडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी "शिख समुदाय सेल" हा सुरू केला असून या सेलचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष गुरमीतसिंग चरणसिंग गिल यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. ते नक्कीच पक्षासाठी चांगले योगदान देतील