रत्नागिरी : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी आज १६ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. तीन ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी 9 उमेदवार रिंगणात आहेत, तर सदस्य पदाच्या 46 जागांसाठी 96 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.आज तीन ग्रामपंचायतीमध्ये 19 मतदान केंद्रांवर 17 हजार 829 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 9 हजार 47 स्त्रीया आणि 8 हजार 782 पुरुष मतदारांचा समावेश आहे.
रत्नागिरी तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी चरवेली ग्रामपंचायत बिनविरोध झाली. शिरगाव, फणसोप आणि पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होत आहे.
शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी 4 उमेदवार रिंगणात आहेत तर सदस्य पदाच्या 17 जागांसाठी 41 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. शिरगावमध्ये 11 मतदान केंद्रावर 10 हजार 394 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 5 हजार 250 स्त्रीया आणि 5 हजार 144 पुरुष मतदारांचा समावेश आहे.
फणसोप ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत. सदस्य पदाच्या 11 जागांसाठी 17 उमेदवार रिंगणात आहेत. फणसोप ग्रामपंचायतीमध्ये 4 केंद्रांवर 3 हजार 628 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1 हजार 893 स्त्रीया आणि 1 हजार 735 पुरुष मतदार आहेत.
पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी 3 उमेदवार रिंगणात आहेत. सदस्य पदाच्या 11 जागासाठी 31 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये 4 मतदान केंद्रांवर हजार 807 मतदार आपला हक्क बजावतील, त्यामध्ये 1 हजार 104 स्त्रीया आणि 1 हजार 103 पुरुष मतदार आहेत.