कन्नड: शालेय पोषण आहार योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहार ६ तारखेपासून मिळत नाही या आहारात विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे कडधान्य दिले जाते . परंतु कन्नड तालुक्यातील रामनगर पळशी येथील अंजना सागर माध्यमिक विद्यालय येथील आठवीच्या विद्यार्थ्यांना निकृष्ठ दर्जाचा पोषण आहार दिला जातोय हा आहार विद्यार्थ्यांसाठी पोषणयुक्त आहे की फक्त संबंधित मुख्याध्यापकांसाठी  असा प्रश्न उपस्थित केला जातोय शालेय पोषण आहारामध्ये कडधान्याचा वापर करून विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो .मात्र या शाळेतील अनुसूचित जाती आणि जमातीच्या गरीब विद्यार्थ्यांची संख्या या शाळेत जास्त आहे . अशाच गरीब मुलांना पोषणयुक्त आहार मिळून त्यांचा बौद्धिक विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने शालेय पोषण आहार ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली या शाळेतील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा कडधान्ययुक्त आहार दिला जात नाही असा आरोप येथील विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी केला शाळेचा प्रथम सत्र सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा शालेय पोषण आहार दिला गेला नाही तर हा पोषण आहार गेला कुठे असा सवाल पालक उपस्थित करत आहे