औरंगाबाद : पोलीस ठाण्यात साक्ष दिल्याच्या वादातून एकावर गावठी कट्ट्यातुन गोळी झाडून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव शेणपूंजीतील कमळापूर भागात घडली. सागर सुभाष सदर (वय अंदाजे २५, रा. हनुमान नगर कमळापूर) असे गोळी लागून जखमी झालेल्याचे नाव आहे. कमळापूर भागातील हनुमान नगर परिसरातील सागर सदर या तरूणाला त्याच भागातील गजा मोरे याने त्याच्याकडील गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. या गोळीबारात सागर यांच्या उजव्या बरगडीत लागल्याने ते गंभीर जखमी झाले असून उपचारार्थ त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान गजा मोरे याचे बहिणीने सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. दरम्यान सागर याने चुकीची साक्ष दिली. या कारणावरून गजा मोरे याने शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास गजा याने सागरला कमळापूर फाट्यावर अडवले. यावेळी गजाचे चार ते पाच साथीदार आणि सागर यांच्यात वाद झाले. हा वाद विकोपाला गेल्याने गजा मोरे याच्यासोबतच्या साथीदारांनी सागरवर तलवारीने वार केले. ते चूकवतांना सागर हा जमीनीवर कोसळला. याचवेळी गजा याने सागर यांच्यावर गावठी कट्ट्यातुन सुमारे चार ते पाच गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी सागरच्या उजव्या बरगडीत लागली. यावेळी सागर हा गंभीर जखमी झाला. त्याला नागरिकांनी उपचारार्थ तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान एवढी मोठी खळबळ उडवणारी घटना घडल्यानंतरही याबाबत एमआयडीसी वाळूज पोलिसांना साधी खबरही नव्हती
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ChatGPT Outage : लगभग 2 घंटों तक ठप रही चैटजीपीटी की सर्विस, 10 करोड़ यूजर्स हुए प्रभावित
सबसे लोकप्रिय Ai सेवा ने सबसे बड़े आउटेज का सामना किया है। इसके चलते प्लेटफॉर्म की सेवाएं लगभग 2...
प्रवचन देताना महाराजांना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका; लोक म्हणाले...
बिहार: लोकांना संबोधित करताना अचानक त्यांचा श्वासोच्छवास थांबला आणि ते मंचावरच कोसळले. बिहारमधील...
French President Macron praised Narendra Modi for his statement at United Nations General Assembly.
Indian prime minister Narendra Modi right when he said that" time is not for war, not for revenge...
राजस्थान में धीमा हुआ मानसून, अब सितंबर में शुरू होगा तेज बारिश का दौर
राजस्थान में पश्चिमी हिस्से को छोड़कर शेष जगहों पर मानसून कमजोर हो गया। जयपुर, भरतपुर, सीकर, चूरू,...