रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात राज्यातील नव्या सरकारमुळे १०० रुपयांत तेल, साखर, डाळ , रवा मिळणार असून सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात असे २ लाख ७५ हजार लाभार्थी आहेत.
भाजप - शिंदे सरकारच्या धोरणात्मक निर्णयामुळे १०० रुपयात अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना साखर , तेल , डाळ आणि रवा मिळणार असुन रत्नागिरी तालुक्यात ५१ हजार ८५६ लाभार्थी आहेत . तर सर्वाधिक कमी लाभार्थी मंडणगड तालुक्यात १३ हजार ८८१ आहेत . याचे वाटप १४ तारखेपासून रेशनदुकानांच्या गोदामातून केले जाणार आहे . तर दापोली , खेड , मंडणगड , चिपळूण , संगमेश्वर , लांजा आणि राजापूर तालुक्यातही लाभार्थी असून २,७५,८५७ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे , असे रत्नागिरी जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी सूचित केले आहे.