भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी राहुल लोणीकर

भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी मराठवाड्याचे युवा तडफदार नेतृत्व ज्यांना मराठवाड्यात युवा हृदय सम्राट म्हणून ओळखले जाते असे राहुल लोणीकर यांची युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. 

राहुल लोणीकर हे माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांचे चिरंजीव आहेत. याआधी ते युवा मोर्चामध्ये प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. त्यांनी जालना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषविले आहे. लोणीकर यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनचा वर्षा होत आहे.