रत्नागिरी : एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी वाढीव वेतनासाठी 2018 मध्ये संप पुकारला होता. तेव्हा महामंडळाने 16 दिवसांची कर्मचाऱ्यांची वेतन कपात केली होती. या विरोधात कर्मचारी न्यायालयात गेले होते. न्यायालयाने केवळ चार दिवसांचे वेतन रद्द करण्याचे आदेश देत 12 दिवसांचे कापलेले वेतन परत देण्याची सूचना केली आहे. 65 टक्के कर्मचाऱ्यांना ही एक प्रकारे दिवाळीपूर्वीची भेटच मानली जात आहे.

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

रत्नागिरी विभागात नऊ आगार असून, महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी 8 व 9 जून 2018 रोजी वाढीव वेतनासाठी संप पुकारला होता. तेव्हा महामंडळाने संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर कारवाई करताना 16 दिवसांची वेतन कपात केली होती. एस. टी. कर्मचाऱ्यांचे वेतन आधीच तुटपुंजे आहे, त्यातच 16 दिवसांची वेतन कपात केली तर कर्मचाऱ्यांनी आर्थिक नुकसान टाळण्यासाठी न्यायालयात दाद मागितली होती. कर्मचाऱ्यांच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला असून, केवळ चार दिवसांचे वेतन रद्द करत 12 दिवसांचे वेतन परत देण्याची सूचना केली आहे.