मगरपट्टा चौकातील महादेव मंदिराशेजारील पदपथावर ड्रेनेज लाईन खोदून राडारोडा टाकला आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे डास-मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ड्रेनेज लाईन पुन्हा चोकअप झाल्याची तक्रार अॅड. व्ही.व्ही.बोरकर, राजेंद्र राऊत, सेवानिवृत्त पीएसआय राजकुमार माने यांनी 3 केएमसी बोलताना केली. ठेकेदाराने काम पूर्ण केले की नाही याची पाहणी पालिका अधिकाऱ्यांनी का केली नाही, असा सवाल माने यांनी उपस्थित केला. अॅड. बोरकर म्हणाले की, दिवाळी तोंडावर आली आहे, महादेव मंदिरामध्ये दिवाळी पहाट कार्यक्रम होतो, उद्यानामध्ये दररोज हजारो नागरिक वॉकिंगसाठी येतात, त्यांना या दुर्गंधीचा त्रास होत आहे. डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढण्याची पालिका प्रशासन वाट पाहातेय का, अशी विचारणा प्रशासनाला त्यांनी केली.