औरंगाबाद : जिल्हाधिकारी सुनील चव्हाणांची मुंबईत बदली येथे झाल्यानंतर आस्तिक कुमार पांडे यांनी शुक्रवारी ( 14 ऑक्टोबर ) औरंगाबाद जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतला . यावेळी शासनाच्या सर्व शासकीय योजना ग्रामीण भागात राहून औरंगाबाद जिल्ह्यात विकासाची कामे करणार असल्याचे औरंगाबादचे नवीन जिल्हाधिकारी अस्तितकुमार पांडे यांनी सांगितले . यावेळी सुनील चव्हाण यांची उपस्थित होते . चव्हाणांनी दिल्या शुभेच्छा पांडे यांनी शुक्रवारी सुनील चव्हाण यांच्याकडून पदभार घेतला . यावेळी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते . सुनील चव्हाण यांनी देखील पांडे यांना शुभेच्छा दिल्या मनपाला पूर्ण सहकार्य करणा यावेळी पांडे यांनी सांगितले की , औरंगाबाद महापालिकेला जिल्हाधिकारी म्हणून पूर्ण सहकार्य केले जाणार आहे . मी मनपात आयुक्त म्हणून काम केल्यामुळे मनपाच्या प्रश्नांची मला जाणीव आहे . त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने मनपासाठी पूर्ण सहकार्य केले जाईल असे त्यांनी सांगितले

 यावेळी पांडे यांनी सांगितले की औरंगाबादच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात पाणीपुरवठा योजनेच्या बाबतीत मनपात मी असताना या संदर्भात सातत्याने काम केले . सध्या विभागीय आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व काम सुरू असून जिल्हाधिकारी म्हणून देखील मी या कामाचा सातत्याने पाठपुरावा करणार आहे असे त्यांनी सांगितले . ग्रामीण भागात योजनांचा लाभ पांडे यांनी सांगितले की शासनाच्या योजना खूप मोठ्या प्रमाणात आहेत . या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे काम असून या योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे माझे उद्दिष्ट असल्याचे पांडे यांनी सांगितले . चव्हाणांना दिला अधिकाऱ्यांनी निरोप सुनील चव्हाण यांची बदली झाल्यानंतर मुंबईतून ते शुक्रवारी औरंगाबाद मध्ये आले . औरंगाबाद मध्ये आल्यानंतर त्यांनी पांडे यांना पदभार दिला . त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी चव्हाण यांच्याशी भेटून त्यांना निरोप दिला . अनेकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत मुंबईच्या विकास आयुक्त असंघटित कामगार या पदासाठी शुभेच्छा देखील दिल्या