अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अमरावती : - 31 डिसेंबर च्या दिवशी नववर्षाच्या पूर्वसंध्येला अमरावती शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 31 डिसेंबरला पोलीस आयुक्त रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सीआईयु पथक गठीत करण्यात आले आहेत. या पथकाला सूत्रानुसार गुप्त माहिती मिळाली की अमरावती नागपूर मार्गावरील फत्तेपुर शिवणगाव या मार्गाने अवैध रित्या अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती असल्याने नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील शिवणगाव फत्तेपुर या मार्गाने सीआयू पथकाने गस्त घालून नाकाबंदी करून दुपारच्या 2 वाजताच्या सुमारास फत्तेपुर शिवणगाव रोडवर संशयीतरित्या वेरणा चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. 12 ई.टी. 8773 ची तपासणी केली असता. कार मध्ये अवैध रित्या देशीदारूचा साठा आढळून आल्याने कार चालक आरोपी नितीन ओंकारराव खडसे, वय 45, राहणार फत्तेपुर शिवणगाव, तर साथीदार दुचाकी चालक दुचाकी क्रमांक एम.एच. 27 डी. 7585 चा आरोपी भूषन विलासराव लंगडे, वय 35,राहणार सालोरा खुर्द या दोघांना ताब्यात घेऊन आरोपी कडून 384 नग 180 मि.ली., देशी दारू च्या बॉटल, किंमत अंदाजे 26हजार880रुपये, 100 नग 90 मी.ली. देशी दारू बॉटल किंमत अंदाजे 4 हजार रुपये तर एम.एच.12 ई.टी. 8773 व्हरेना कार किंमत अंदाजे 8 लाख रुपये तर दुचाकी क्रमांक एम.एच. 27 डी. 7585अंदाजे किंमत 60 हजार रुपये असा एकूण 8लाख90हजार880रुपये चा माल जप्त करण्यात आला असून ही कारवाई अमरावती शहर पोलीस आयुक्त नविनचंद रेड्डी यांच्या आदेशाने सी.आई.यु पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे,पोलीस उप निरीक्षक गजानन राजमालू तसेच सफौ. विनय मोहोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील लासुरकर, पोलीस नायब जहिर शेख, अतुल संभे, पोलीस शिपाई राहुल ढेंगेकर,विनोद काटकर यांनी हि कारवाई केली आहे.