प्रशासकाने नगरपरिषदेचा कारभार गांभीर्याने करावा ;पंधरा दिवसाला पाणी बीडकरांचे दुर्दैव नवनाथ शिराळे

बीड प्रतिनिधी

बीड नगर परिषदेवर प्रशासक येऊन बरेच कालावधी झाला.

परंतु अद्याप प्रशासकाने नगरपालिकेच्या कारभाराला हात लावल्याचे दिसत नाही.

नगरपालिकेची मुदत संपल्यामुळे नगराध्यक्ष यांना कारभारातून कार्यमुक्त व्हावे लागले. यानंतर मुख्याधिकारी आणि प्रशासक उपजिल्हाधिकारी यांच्या कडे नगरपरिषदेचा कारभार आला. क्षीरसागर कार्यमुक्त झाल्यानंतर किमान अधिकारी तरी सद्विवेक बुद्धी ठेवून कारभार चालवतील नागरिकांना मूलभूत सुविधा देतील अशी अपेक्षा होती परंतु दुर्दैवाने असे घडले नाही. 

बीड शहरातील नागरिकांना प्रशासक कोण आहे मुख्याधिकारी कोण आहे हे अजून देखील माहित नाही. कारण हे दोघे क्षीरसागर यांच्या सावली मागे चालत नगरपालिका हाकलत आहेत. दोन्ही सक्षम अधिकाऱ्याने रस्त्यावर उतरून जनतेच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवा ही बीडकरांची मागणी आहे.

बीड शहराला पंधरा दिवसाला पाणीपुरवठा होतो. शहर खड्डेमय आणि चिखलमय झाले आहे. शहराच्या बहुतेक भागात अंधाराचे साम्राज्य पसरले. या गलतान कारभारामध्ये बदल करण्याची भूमिका प्रशासनाची आहे परंतु प्रशासन ही जनसेवा करण्यास उदासीन दिसत आहे.

 प्रशासन स्वतः कारभार न चालवता क्षीरसागरांच्या हातचं बाहुले झाले आहे. 

आज कोणालाही नगरपरिषद कारभारात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही परंतु क्षीरसागर यांच्या इशारावरती कारभार चालू असल्याचे दिसत आहे. 

ते सांगतील त्या भागातील स्वच्छता करणे, पथदिवे बसवणे पाणी पुरवठ्याची पाईपलाईन टाकणे अशी कामे क्षीरसागर यांच्या म्हणण्यानुसार केली जात आहे. अशी स्पष्ट तक्रार बीडचे नागरीक करत आहेत. प्रशासकाकडे कारभार असताना शहराच्या सर्व भागात साफसफाई झाली पाहिजे, पाणीपुरवठा नियमित व सुरळीत झाला पाहिजे, भुयारी गटारी योजना असो अथवा अमृतजल योजना असो या योजनेचे काम नियोजित अंदाजपत्रका प्रमाणे काम झाले पाहिजे, 

पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल वितरणात राजकीय हस्तक्षेप न होऊ देता ती राबवली पाहिजे. लाभ धारकांना तातडीने अनुदान वाटप केले पाहिजे,

परंतु दुर्दैवाने असे घडत नाही राजकीय हेतू ठेवून त्या त्या भागात कामाला गती दिली जात आहे. हा सर्व प्रकार प्रशासनाच्या डोळ्यादेखत चालू असल्याने शहरातील सुजाण नागरिकांवर हा अन्याय होत आहे. नगरपालिकेच्या या बटीक कारभारामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा येत आहे.

नगरपालिका मुख्याधिकारी आणि प्रशासक यांनी ताबडतोब या अनागोंदी कारभारावर नियंत्रण आणावे. सुरळीत व सर्व समावेशक कारभार सुरू करावा अन्यथा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्या विरोधात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे कडे तक्रार करून 

कठोर कारवाई केली जाईल असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव व माजी सभापती नवनाथ शिराळे यांनी केले आहे.