माजी गटशिक्षणाधिकारी पंडितराव घुगे यांचे आवाहन...*

जिंतूर 

                       तालुक्यातील 

जिल्हा परिषद प्रशाला भोगाव देवी येथे पहिले मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून माजी गटशिक्षणाधिकारी पंडितराव घुगे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी समाज कल्याण सभापती लिंबाजीराव पुंजारे उपस्थित होते.

  यावेळी बोलताना घुगे साहेब म्हणाले की सर्व शिक्षकांनी वर्गात जाण्यापूर्वी तयारी करूनच वर्गात जावे.सर्व शिक्षकांना शिकवण्याची आवड हवी, त्याबद्दल आत्मीयता हवी. शिक्षकांनी विद्यार्थ्यात मिसळले पाहिजे. शिक्षकावर कुणीही दबाव आणू नये आणि शिक्षकांनीही दबावाखाली काम न करता अंत: प्रेरणेने कार्य केले पाहिजे. तसेच मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांना समान वागणूक द्यावी काम करणाऱ्यावर अन्याय होऊ देऊ नये. कामाचे डिस्ट्रीब्यूशन करावे, आपल्या कामाची पब्लिसिटी करावी. मुख्याध्यापकाने कुटुंब प्रमुखा प्रमाणे जबाबदारी पार पाडावी. अशाप्रकारे त्यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या अनेक उदाहरणे देऊन समजावून सांगितली. गावकऱ्यांनीही शाळेला जमेल तेवढे सहकार्य केले पाहिजे. भोगावच्या गावकऱ्यांनी त्यांना त्यांच्या कार्यकाळात कशी साथ दिली याची अनेक उदाहरणे त्यांनी सांगितली.

    आपल्या शाळेत दानपेटी ठेवायला पाहिजे. म्हणजे आमच्यासारखे माजी शिक्षक किंवा माजी विद्यार्थी येथे आल्यानंतर या ज्ञानमंदिरात नतमस्तक होऊन आपले सतपात्री दान या दानपेटीत टाकतील. आणि या सतपात्रि दानाने शाळेचा विकास करता येईल. तसेच यावर्षी दहावी इयत्तेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनीस 1000 तर विद्यार्थ्यास पाचशे रुपयांचे बक्षीस त्यांनी जाहीर केले.

   यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे पुंजारे म्हणाले की शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम व्हायला हवेत. तसेच शाळेसाठी पूर्ण वेळ देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

 शिक्षणप्रेमी बालाजी देशमुख यांच्या संकल्पनेतून आजचे पहिले मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. यावेळी अध्यक्ष म्हणून विस्तार अधिकारी मनोज तोडकर, मुख्याध्यापक राजेश कलगुंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंढरीनाथ बुधवंत यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व गावकरी उपस्थित होते.