रत्नागिरी : शिरगांव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अटीतटीची लढतीसाठी दि. १६ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. दि. २२ एप्रिल २०२१ रोजी ग्रामपंचायतीचा पाच वर्षाचा कार्यकाल संपल्याने दीड वर्षांपासून प्रशासक काम पाहात आहेत. रत्नागिरी तालुक्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या ग्रा.पं.च्या थेट सरपंच पदाच्या एका जागेसाठी चौरंगी, सदस्यपदाच्या १७ जागांसाठी ४२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
शिवसेना-राष्ट्रवादी- कॉंग्रेस महाविकास आघाडी पुरस्कृत गाव पॅनेल तयार करण्यात आले असून त्यांच्यामार्फत सरपंचपदासाठी सौ. फरिदा रज्जाक काझी यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांची निशाणी कपबशी आहे. उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सहयोग गांव विकास पॅनल उभे करण्यात आले आहे. त्यांच्यामार्फत सौ. साक्षी परेश कुमठेकर या सरपंचपदाच्या उमेदवार असून त्यांची निशाणी हेलिकॉप्टर आहे. या दोघांव्यतिरिक्त सौ. श्रद्धा दीपक मोरे, शाहीन काझी या दोघीजणी सरपंच पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. ग्रा.पं. क्षेत्रातील सुमारे १६ हजार मतदारांमधून सरपंच निवडावयाचा आहे. सहा प्रभाग असून प्रत्येक प्रभागात सरासरी दोन हजार इतकी मतदारांची संख्या आहे. शिरगांव ग्रामपंचायत क्षेत्राच्या विकासासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सोयिस्कररीत्या दुर्लक्ष केले आहे. ना. उदय सामंत यांच्या माध्यमातून रस्ते, गटारे, पाणी योजना, स्ट्रीट लाईन आदी विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. ना. सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सहयोग गाव विकास पॅनेलचे उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
दि. १६ ऑक्टोबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत विविध केंद्रांवर मतदान होणार आहे. दोन्ही पॅनेलच्यावतीने शिरगांव ग्रा.पं. क्षेत्राच्या विकासाचा निर्धार करण्यात आला आहे. सध्या सर्वच उमेदवार घरोघर जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. पहिल्या टप्प्यात संथगतीने प्रचार सुरू आहे. अखेरच्या -टप्प्यात प्रचाराची गती अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. आरोप-प्रत्यारोपाकडे दोन्ही पॅनेलने दुर्लक्ष केले आहेत. मतदारांशी असलेल्या संपर्कानुसार उमेदवार निवडीला प्राधान्य दिले जाणार आहे. सर्वात मोठी ग्रामपंचायत असुनही नियोजनबद्ध विकासाकडे दुर्लक्ष केल्याने मतदारांमधील नाराजी अद्यापही कायम आहे. दीड वर्षे प्रशासकाच्या हाती सत्ता असल्याने ग्रामपंचायत क्षेत्रातील विकासाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे.
अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून नळपाणी पुरवठा योजनेला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आल्याने अन्य इच्छुकांमधील नाराजी कायम आहे. नाराज झालेल्यांनी सध्या गप्प राहण्याची भूमिका घेतली असून निवडणुकीच्या कालावधीत ते नेमके काय करतील? याबाबत काहीही सांगता येत नसल्याने उमेदवारांमधील संभ्रम वाढला आहे. प्रत्येक प्रभागात उमेदवारांनी जनसंपर्क कार्यालय हंगामी स्वरूपात स्थापन केले आहे. विकासाची संकल्पना मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतः उमेदवारांनीच पुढाकार घेतला आहे. दोन्ही पॅनल राजकीयदृष्ट्या अधिक मजबूत असून आपापली ताकद मतदानाच्या वेळी ते दाखवून देण्याची शक्यता आहे. शिंदेसेना विरूद्ध महाविकास आघाडी अशी खरी लढत होत आहे.
रत्नागिरी तालुका भाजपाने शिरगांव ग्रा.पं. निवडणुकीकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले आहे. भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते कोणत्या पॅनलच्या पाठीमागे राहतात हे पाहणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारापासून सध्या तरी पूर्णतः अलिप्त राहिलेले आहेत. आयत्या वेळी ते कोणता निर्णय घेतील याबाबतची संभ्रमावस्था कायम आहे. भाजपाच्या मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांनी सुरू केला आहे. सरपंच पदासाठी होणारी बंडखोरी सर्वांसाठी अधिक त्रासदायक ठरणार असून मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होणार आहे.