दरेगाव शेतशिवारात सोयाबीन पिकाचे नुकसान
औंढा नागनाथः- तालुक्यातील दरेगाव या भागात रात्रीच्या सुमारास अतिवृष्टीजन्य पाऊस झाल्यामुळे ओढ्याकाठच्या शेतातील सोयाबीन हळद कापूस तुर या पिकांमधून पाणी गेल्यामुळे काढणीला आलेले सोयाबीन हे पूर्णपणे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरेगाव येथील शेतकऱ्यांनी दिनांक १० आँक्टोबर रोजी तहसीलदार डॉ कृष्णा कानगुले यांना अतिवृष्टी होऊन पिकाचे नुकसान झाले. तात्काळ महसूल विभागाने शेतामध्ये जाऊन पिकाची पाहणी करून तात्काळ पिकाचे पंचनामे करून दिवाळी पहिले शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदरील निवेदनावर शेतकरी मल्हारी पानबुडे, हानवता गायकवाड, नागनाथ गायकवाड ,नवनाथ दांडेगावकर, गणेश पानबुडे, कृष्णा गायकवाड ,लष्कर पवार ,परसराम दांडेगावकर, किसन गु-हाडे, पिराजी गायकवाड ,दिलीप गायकवाड, मोतीराम पानबुडे यांच्यासह 100 शेतकऱ्यांच्या सह्या निवेदनावर असून निवेदन देतेवेळी शेतकरी उपस्थित होते.