सोलापूर :- कवियत्री शांताबाई शेळके यांच्या लेखन साहित्यातून अनेक पिढ्या घडल्या त्यांच्या कविता वाचून, एैकून उदास मनही प्रफुल्लीत होते अशा या साहित्य लेखनाच्या माध्यमातून शांताबाई शेळके या अजरामर झाल्या असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि सुमन डायबेटीज फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अनवट शांताबाई या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
कवियत्री आणि लेखिका शांताबाई शेळके यांच्या कविता आणि गद्य लेखन आजच्या पिढीला मार्गदर्शक आहे असेही सातपुते यांनी सांगितले. प्रारंभी तेजस्वी सातपुते, मसाप दक्षिण शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर, कार्याध्यक्ष प्रशांत बडवे आणि इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर यांनी प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी गेल्या आठ वर्षापासून महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. सोलापूरकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी देण्याचे काम परिषदेच्या माध्यमातून करण्यात आल्याचेही महागांवकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. त्यानंतर अध्यक्षा रेणुका महागांवकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्या पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सुमन डायबेटीज फौंडेशनचे डॉ्नटर श्रीकांत पागे यांनी अनवट शांताबाई या कार्यक्रमातील सहभागी कलावंताचा परिचय करून दिला. तसेच मधुमेहाबाबत सुमन डायबेटीज फौंडेशन आणि सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल डायबेटीज केअर सेंटर यांच्या कार्याची माहिती दिली. यामध्ये अनवट शांताबाई कार्यक्रमाच्या संशोधन, संहिता लेखन आणि बांधणी करणाऱ्या डॉ.वंदना बोकील कुलकर्णी यांचा सत्कार सुमन डायबेटीज फौंडेशनच्या प्रमुख डॉ.संगिता पागे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमातील अभिवाचक अनुराधा जोशी यांचा सत्कार अविनाश महागांवकर यांच्या हस्ते झाला. दीपाली दातार यांचा सत्कार अमोल धाबळे यांच्या हस्ते तर गौरी देशपांडे यांचा सत्कार अभय जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला व्हायोलीनची साथ देणारे अनुप कुलथे यांचा सत्कार विनायक होटकर यांच्या हस्ते झाला. कवियत्री शांता शेळके म्हणतात काय पण गंमत आहे बोलण्यात आपण शब्द किती पटकन बदलतो कशालाही नावं देताना त्यांच्या स्थानावरून निश्चित ठरवतो. नितळ रस्त्यावरच्या खराब भागाला खड्डा म्हणून हिणवतो तर नितळ गालावरच्या छोट्या खड्ड्याला खळी म्हणून खुलवतो, भिंतीवर पडलेल्या काळ्या ठिप्नयाला डाग म्हणून डावलतो तर चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागाला तीळ म्हणून गोंजारतो, या अशा विविध कवितांचे अभिवाचन केले सर्व कलावंतानी केले त्याला खास पध्दतीने अनुप कुलथे यांनी व्हायोलीनची साथ करून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. अॅम्फी थिएटरमध्ये तब्बल दीड तासाच्या या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी मोठी गर्दी करून भरभरून दाद दिली.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मसाप दक्षिण शाखेचे प्रमुख कार्यवाह जितेश कुलकर्णी यांनी केले तर कार्यकारणी सदस्य प्रकाश मोकाशे यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमासाठी रंगमंचाची आकर्षक सजावट गुरू वठारे यांनी करून कार्यक्रमाची उंची वाढवली.