,*मुख्य अधिकारी नसल्याने रामभरोसे कारभार जिंतूर नगरपालिका* 

जिंतूरकरांना दहा दिवसापासून पाणी नाही 

ऐन दिवाळीच्या तोंडावर जिंतूरकर त्रस्त

जिंतूर 

जिंतूर शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा गेल्या दहा दिवसापासून विस्कळीत झाला असून ऐन दिवाळीच्या तोंडावर नागरिक त्रस्त असून नगरपालिका कारभार राम भरोसे चालत आहे

शहराची 50 हजारावर लोकसंख्या असून जिंतूर नगर परिषदेच्या वतीने शहरापासून जवळ असलेल्या येलदरी जलाशयातील पाणीपुरवठा योजनेतून शहराला पिण्याचा पाणीपुरवठा होतो परंतु गेल्या दहा दिवसापासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून तांत्रिक बाबीचे कारण पुढे करून पाणीपुरवठा होत नसल्याचे कारण जरी पुढे करीत असले तरी सत्यता आज जाणण्यासाठी जिंतूर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांनी जिंतूर नगरपरिषद कार्यालयात भेट दिली नेहमीप्रमाणे मुख्याधिकारी उपस्थित नव्हते तर पाणीपुरवठा विभागाचे अभियंता प्रभारी असून तेही रजेवर होते त्यामुळे जिंतूर नगर परिषदेचा पाणीपुरवठा विभाग आणि एकंदर नगरपालिकेचा विभाग रामभरोसे असल्याचे दिसून आले असून ऐन दिवाळीच्या तोंडावर जिंतूरकरांना पाण्यासाठी त्रास भोगाव लागत आहे एकंदर धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच काहीशी परिस्थिती जिंतूरकरावर आली असून जिंतूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी देविदास जाधव नावाचे असून त्यांना सेलूचाही पदभार आहे परंतु त्यांनी जिंतूर कडे नेहमीच दुर्लक्ष करतात आणि कार्यालयात कधीही हजर राहत नाही याचाच परिणाम म्हणून नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यावर सुद्धा कुणाचा वचक राहिला नसून त्यामुळे सर्वसामान्यांची अनेक कामे खोळंबली आहेत तर पिण्याच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न आता गंभीर बनला आहे याबाबत इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकारांनी थेट मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनला बसून मुख्याधिकारी येण्याची वाट बघितली परंतु त्यांनी आपला भ्रमणध्वनी बंद करून येण्याचे टाळले कार्यालय अधीक्षक मुळी यांनी वेळ मारून नेत पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे मोघम उत्तर देऊन वेळ मारून नेली आहे दरम्यान प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी यांनी या गंभीर प्रकाराबाबत त्वरेने लक्ष घालण्याची गरज आहे नागरिक मात्र त्रस्त आहेत