आज दिनांक 13 ऑक्टोंबर 2022 रोजी वंचित बहुजन आघाडी चे ॲड. सुरेश काळे यांनी माननीय पंतप्रधान कार्यालय दिल्ली व माननीय राष्ट्रपती कार्यालय दिल्ली यांच्याकडे परतुर वार्ड क्रमांक चार मधील राहणारा आदिवासी समाज याच्या विषयी अनेक दिवसांपासून त्यांच्या रस्त्याच्या समस्या असतील बचत गटांच्या समस्या असतील नमुना नंबर आठ च्या समस्या असतील सतत गेल्या बऱ्याच दिवसांनी त्यांनी वंचित बहुजन आघाडी मार्फत त्यांचा आवाज मुख्यमंत्री कार्यालय असेल किंवा पंतप्रधान कार्यालय असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा काम केलेला आहे. दिनांक 12 ऑक्टोबर 2022 रोजी उपविभागीय कार्यालय परतूर येथे जाऊन त्यांनी माननीय (SDM) भाऊसाहेब जाधव यांच्याशी वार्ड क्रमांक चार मधील वास्तव्यास असणाऱ्या लोकांच्या रस्त्याची व त्यांच्या नमुना नंबर आठ वरील काबीज या नावाबद्दल परत चर्चा केली असता माननीय भाऊसाहेब जाधव यांनी आपल्याला ते नियमाकुलित करता येणार नाही असे स्पष्टीकरण दिले. परंतु ही जागा मातंग वस्ती म्हणून 1990 चा पुरावा देऊन सुद्धा जर हे जागा नियमकुलीत होत नसेल तर माननीय Adv. सुरेश काळे सरांनी पंतप्रधान कार्यालय व राष्ट्रपती कार्यालय यांच्याकडे तक्रार दाखल आज रोजी केलेली आहे. जर त्यांच्या या मागन्या पूर्ण झाल्या नाही तर येणाऱ्या 28 तारखेला वंचित बहुजन आघाडी कडून मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभारण्यात येणार आहे अशी सुद्धा ते आमच्याशी बोलताना म्हणाले.