दौंड: रावणगाव (ता. दौंड ) ग्रामपंचायत हद्दीत टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन ट्रॉलीत बसलेल्या ३ महिलांचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर ५ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हि घटना गुरुवारी (ता. १३) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रावणगाव ग्रामपंचायत हद्दीत ट्रॅक्टरमधून शेतातील टोमॅटोचीवाहतूक सुरु होती. टोमॅटोचे ७५ ते ८० क्रेट यामध्ये होते. टोमॅटो घेऊन ट्रॅक्टर ट्रॉलीसह शेतातून बाहेर पडताना पडताना खडकवासला कालव्याच्या ३२ व्या क्रमांकाच्या वितरीकेवरून निघाला होता. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास टोमॅटोने भरलेला ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढत असतानाट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटूले व ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढत असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॉलीत बसून निघालेल्या ९ महिला या ट्रॉलीखाली सापडल्या.दरम्यान, रावणगाव परिसरातील या महिला होत्या.उपचारादरम्यान यापैकी तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित महिलांवर दौंड व भिगवण येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.