खासगी प्रवासी वाहतूक कारने सायकलस्वार शालेय विद्यार्थ्याला पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे तो जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी वैजापूर - गंगापूर रस्त्यावरील बाजाठाण फाटा परिसरात घडली . आनंद अशोक जगताप ( १४ , रा . शिरसगाव , ता . वैजापूर ) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे . याप्रकरणी वीरगाव ठाण्यात अभिजित नरहरी दहिवाळ ( रा . औरंगाबाद ) या कार चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवण्याचा गुन्हा दाखल केला . शिरसगावहून महालगावच्या न्यू हायस्कूलमध्ये नववीत शिकणारा आनंद जगताप हा सायकलवरून जात होता . बुधवारी सकाळी शाळेत पोहोचण्यासाठी अवघे १ किमी अंतर शिल्लक असतानाच पाठीमागून कारने ( एमएच ११ सीजी ९ ८ ९९ ) त्याच्या सायकलला जोराची धडक दिली . यामुळे आनंद जागीच ठार झाला . वाहनचालकाने जखमी विद्यार्थ्याला त्याच वाहनातून वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्याची तत्परता दाखवली होती . मात्र , वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तो मृत झाल्याचे घोषित केले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
गौ भक्तों ने नन्दी का उपचार कर पहुंचा गौशाला
गौ-भक्तों ने नन्दी का उपचार कर पहुंचाया गोशाला
रेवदर । कस्बे की गौ-भक्तों की टीम को...
जगपुरा से श्री बाबा रामदेव जी व सांवरिया सेठ के लिए 70 यात्री रवाना
जगपुरा से श्री बाबा रामदेव जी व सांवरिया सेठ के लिए महिला व पुरुष 70 यात्री रवाना हुए।...
ધાનેરા નગરપાલિકા વિસ્તારમાં આવેલ શિતલ શોપિંગ સેન્ટરના આજે રાત્રે જાહેર રોડ સાઈડથી છતના પાંપડાં તુટી પડ્યા હતાં.
ધાનેરા નગરપાલિકા વિસ્તારમાં આવેલ શિતલ શોપિંગ સેન્ટરના આજે રાત્રે જાહેર રોડ સાઈડથી છતના પાંપડાં...
પેટલાદમા ગાડીમા સાપનુ બચ્ચુ
પેટલાદમા કાર વોશિંગ દરમિયાન એક ગાડીમાંથી સાપનુ બચ્ચું નીકળ્યું હતું. જેને યુવક દ્વારા પકડી...
विटामिन E के चौंकाने वाले 9 फायदे | 9 surprising benefits of Vit E #vitamine #skin #hair
विटामिन E के चौंकाने वाले 9 फायदे | 9 surprising benefits of Vit E #vitamine #skin #hair