रत्नागिरी : मारूती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर दि. १४ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता जिल्हास्तरीय ज्युनियर तिरंदाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इंडियन कंपाऊंड, रिक अशा तीन प्रकारात सदरची स्पर्धा होणार आहे. प्रत्येक प्रकारातून पहिल्या सहा जणांची निवड गोंदिया येथे दि. १८ ते २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राज्य ज्युनियर तिरंदाजी स्पर्धेकरीता होणार आहे. स्पर्धेसाठी खेळाडू दि. १ जानेवारी २००२ नंतर जन्मलेला असावा. इच्छुक खेळाडूंनी आपल्यासोबत दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, वयाचा मूळ दाखला, स्वतःचे धनुर्विद्येचे सामान आणावयाचे आहेत. खेळाडूंचे जिल्हा, राज्य रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व ज्युनियर खेळाडूंनी याची नोंद घेऊन जास्तीत जास्त खेळाडूंनी दि. १४ ऑक्टोबरच्या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन राज्य पंच श्रीमती समिधा संजय झोरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९०२१३८१८५८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.