खेड : अनिल परब यांचे दापोली तालुक्यातील मुरुड येथील बहुचर्चित साई रिसॉर्ट पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडून रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात 1 कोटी 1 लाख 25 हजार रुपये जमा केले आहेत, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत दिली दिली आहे.
दापोली तालुक्यातील मुरुड येथील बहुचर्चित साई रिसॉर्ट वसी कौंच रिसॉर्ट तोडण्याचे आदेश केंद्र शासनाच्या वन, पर्यावरण मंत्रालयाने नुकतेच दिले आहेत. त्यानंतर राज्य शासनाकडूनही तत्काळ हालचाल सुरु झाली. रत्नागिरीचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ बी एन पाटील यांनीही हे रिसॉर्ट तोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश दिले होते. त्यानंतर रिसॉर्ट पाडण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु झाली. आता त्याचाच पुढचा भाग म्हणून महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडून रिसॉर्ट पाडण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात 1 कोटी 1 लाख 25 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत दिली दिली आहे. त्यामुळे लवकर हे रिसॉर्ट जमीनदोस्त होणार आहे.