*बोरी जि.प.उर्दू शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शेख रियाज यांची बिनविरोध निवड*

 जिंतूर तालुक्यातील बोरी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. असून अध्यक्षपदी शेख रियाज यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी निसार कुरेशी यांची निवड करण्यात आली.

  जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ संपन्न झाला असून शिक्षण विभागाच्या वतीने आदेशित केलेल्या पत्रांतर्गत पालकांना नोटीस पाठवून पालकांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीदरम्यान अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्यांची निवड करण्यात आली सदस्यांमध्ये अहसान खान पठाण, शेख जाकीर, यास्मिन बी, सकीनाबी, रईसा शेख, नसीम बी, तसलीम कुरेशी यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचे मुख्याध्यापिका तहसीन फातिमा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ही निवड प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उबेद सर आतीक सर यांनी परिश्रम घेतले होते.

 माजी सभापती अशोकराव चौधरी यांच्या निवासस्थानी जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख रियाज यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सभापती रामराव उबाळे उपसरपंच शेख रफिक मौलाना मकसूद राहुल कनकुटे करून नागरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.