चिंचाळा येथील नदी वरिल काल झालेल्या पाऊसाने पुल गेला पुर्ण वाहुन शाळेतील विद्यार्थी व शेतकरी यांना करावी लागते जिव घेणे कसरत
नदी वरिल पुल न झाल्यास चिंचाळा ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार करणार
आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथील नदीवरील पूल पुर्णताह काल दि.12.10.2022 रोजी दुपारी एक वाजता झालेल्या पाऊसाने वाहुन गेला आहे शेतकरी यांना आपल्या जनावरांसाठी चारा आणण्यासाठी जिव घेणे कसरत करुन आपल्या मुक्या जनावरांना चारा आणावा लागत आहे तसेच प्राथमिक शाळेच्या 40 विद्यार्थी यांना आपला जिव मुढीत दरुन जिव घेणा प्रवास करावा लागत आहे चिंचाळा गावकरी यांचें असे म्हणणे आहे की कोणत्याही राजकीय नेत्यांनी हा पुल आपला फंड टाकुन हा पुल करण्यात यावा किंवा शासनाने करावा नसता पुढिल येणार्या ग्रामपंचायत , पंचायत समिती , जिल्हा परिषद,व विधानसभा निवडणुकीत सर्व चिंचाळा ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकणार आहे असा चिंचाळा ग्रामस्थ यांचा निर्णय आज झालेल्या चिंचाळा येथे बैठकीत झाला आहे मागिल दोन वर्षा पासून हा पुल निमा तुटून गेला होता पण काल झालेल्या पाऊसाने पुर्ण वाहुन गेला आहे यामुळे शेतकरी यांना आष्टी शहरात दुध घालण्यासाठी जावे लागते, शेतकरी यांना आपल्या जनावरांसाठी चारा आणावा लागतो, तसेच नदी पलीकडील 40 प्राथमिक शाळेतिल विद्यार्थी यांना हिच नदी पार कडुन शाळेत यावे लागते जर शेतकरी, लहान मुला़चा यात जिव गेला तर जबाबदार कोण तरी हा पुल कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्या फंडातून करावा किंवा शासनाने करावा नसता येणार्या आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय चिंचाळा ग्रामस्थ यांनी घेतला आहे