रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वीत झालेली असून योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यक्ती/संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबत अधिका माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, रत्नागिरी द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, जेल रोड, रत्नागिरी दुरध्वनी क्रमांक 02352-222379, ई-मेल आयडी dvioratna@rediffmail.com येथे संपर्क साधावा असे आवाहन प्र. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे.
मध उद्योगोच मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष (छंद) प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजार्गती हे या योजनेची वैशिष्टे आहेत. तसेच वैयक्तिक मधपाळ, केंद्र चालक प्रगतीशील मधपाळ हे योजनेतील प्रमुख घटक आहेत.
मधमाशी पालन प्रशिक्षण कार्यशाळा
वालवालकर रुग्णालय, कासारवाडी सावर्डे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी 415606 येथे 21 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 02.00 ते सांयकाळी 05.00 या वेळेत भ.क.ल. वालवालकर रुग्णालय मल्टीपर्पज हॉल येथे मधमाशी पालन प्रशिक्षण कार्यशाळा व शिबीर निशुल्क आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.