चारठाणा 

प्रभाकर कुर्हे चारठाणकर

येथील एकुण चार शाळां पैकी जिल्हा परिषद प्राथमिक व जिल्हा परिषद हायस्कूल या दोन शाळा वगळता केंद्रीय कन्या शाळा व जिल्हा परिषद उर्दू या दोन शाळेमध्ये पालकांची जणू स्पर्धा लागली होती असे चित्र पहावयास मिळाले.जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेत दिनांक 11 ऑक्टोंबर मंगळवारी सकाळी दहा वाजता शालेय व्यवस्थापन समिती गठित करण्यासाठी पालकाची विशेष बैठक मुख्याध्यापक टी.जी.साबळे यांनी बोलावली होती व्यवस्थापन समिती गठीत करण्यासाठी सुरुवात करण्यात आली परंतु सुरुवातीलाच मुख्यधापकाच्या मणमाणी मुळे व निष्काळजी मुळे मोठ्या प्रमाणावर राडा झाल्याने एकच झुंबड उडाली विशेष म्हणजे कोणत्याही वर्गातून निवडून न घेता चिठ्ठ्या टाकून गदारोळ निर्माण करुण निवड रद्द करुण मनमानी चालवण्याचा घाट येथील पालकांच्या लक्षात आल्या नंतर पालकांनी तो हानुन पाडला आखेर सायंकाळी पाच वाजता गट शालेय व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली यावेळी अध्यक्षपदी रामराव नानासाहेब देशमुख तर उपाध्यक्षपदी शेख आयशा हुसेन यांची निवड करण्यात आली अध्यक्षपदी रामराव देशमुख यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदासाठी रत्नाकर सासनिक व शेख आयशा हुसेन या दोघांमध्ये मतदान झाले रत्नाकर सासनिक यांना सहा मते पडली तर शेख आयेशा हुसेन यांना आठ मते पडली असून त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा मुख्याध्यापक टी.जी.साबळे यांनी केली तर सदस्य पदी अजगर देशमुख ,शबाना बेगम तहसीन देशमुख, तबसू म अनिस खा पठाण, संदीप देशमुख, महानंदा झोपडे, संदीप खके, प्रदीप धुमाळ, सिद्धार्थ पांडुरंग सुरवसे, शिल्पा सचिन निकाळजे ,अनिता कैलास हेंद्रे तर सचिव म्हणून टी.जी.साबळे यांची निवड करण्यात आली या निवडीसाठी ए.आर.स्वामी, एन एस गडदे, प्रभाकर कुऱ्हे ,सय्यद मुस्ताक अहेमद आदींनी परिश्रम घेतले या बैठकीत श्रीधर भवरे, आजय देशमुख, संतोष चव्हाण, दीपक भाग्यवंत, बाळासाहेब देशमुख, शेख हुसेन, सुनील कालवले ,अनिस खा पठाण, आदिंची उपस्थिती होती विशेष म्हणजे शालेय व्यवस्थापन समितीमध्ये होणारा गदारोळ पाहून मुजमुले कंपनीने माघार घेऊन सहानुभूती दाखविली या बैठकीसाठी अजय राजखटला ,शिवदास सूर्यवंशी, गाढवे ,महिला पोलीस कर्मचारी अस्मिता मोरे आदींनि चोख बंदोबस्त ठेवला दरम्यान ही शालेय व्यवस्थापन समिती पहिल्यांदाच पोलीस बंदोबस्त मध्ये गठीत करण्यात आली. 

*मागिल दोन वर्षात पदाचा दुरुपयोग करुण मुख्याध्यापकांनी गैरव्यवहार केला........*

                     

   कोरोणा काळात शालेय व्यवस्थापण समिती गठीत करता न आल्याने कोणतेही पत्र किंवा आदेश नसतांना आणी नियमाबाहेर येथील मु. अ. टि.बी.साबळे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत मागिल बाॅडी बरखास्त करून परस्पर सही नमुने बदलुन आलेल्या फंडाचा व शालेय पोषण आहारात गैरव्यवहार करत मलिदा लाटला परंतु आज पालकांनी त्याचा हा घाट हानुन पाडला या बाबतीत शिक्षणाधीकार्यांकडे आपण तक्रार करुण चौकशीची मागणी करणार असल्याचे पालक पत्रकार प्रभाकर कुर्हे यांनी सांगितले.