रत्नागिरी : शिरगाव गावच्या विकासासाठी स्वतंत्र पॅकेज देऊन सहाही प्रभागांचा विकास आराखडा तयार करण्यात येईल. यातून शिरगावचा आदर्शवत विकास तुम्हाला दिसेल. यासाठी संपूर्ण सहयोगी गाव विकास पॅनेलच्या उमेदवारांना मोठ्या फरकाने निवडुन द्या, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
शिंदे सेना पुरस्कृत संपूर्ण सहयोगी गाव विकास पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्ती शिरगावात झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी करण्याचा प्रयत्न आहे. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुक राहुल पंडित, बाबू म्हाप यांच्यासह सरपंच पदाच्या उमेदवार साक्षी कुमठेकर ग्रामपंचायत उमेदवार अल्ताफ संगमेश्वरी, शकील मोडक, नुरीन मुकादम याच्यासह अन्य प्रभागातील उमेदवार उपस्थित होते.
श्री. सामंत म्हणाले, शिरगाव ग्रामपंचायतीची निवडणुक साडे सहा वर्षांनंतर १६ ऑक्टोबर २०२२ ला होणार आहे. या पूर्वी रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून माझ्या माध्यमातून रस्ते, गटारे, साकव, पाणी योजना, स्ट्रीटलाईट इत्यादी शेकडो विकासाची कामे मार्गी लागलेली आहेत. हे कोणीही नाकारू शकत नाही आणि आता तर उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद माझ्याकडे आहे. त्यामुळे शिरगांव गावातील प्रभाग क्र. १ ते ६ मधील सर्व विकास कामे मार्गी लावली जातील. त्यासाठी छोटी-मोठी कामं न करता आता शिरगावच्या विकासासाठी विशेष पॅकेज दिले जाईल. त्यासाठी सर्व प्रभागाचांचा विकास आराखडा तयार करून शास्वत विकास केला जाईल.