औरंगाबाद : राज्यात सत्तासंघर्ष सुरु असतांना गेल्या 9 महिन्यात 756 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटातील राजकीय युद्ध टोकाला पोहचले आहे . राज्यातील राजकारण सद्या या दोन्ही गटाच्याभोवती फिरत आहे . मात्र एकीकडे राज्यात राजकीय आरोप - प्रत्यारोप सुरु असतानाच तिकडे मराठवाड्यात मात्र गेल्या 9 महिन्यात 756 शेतकऱ्यांनी आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचलले आहे . धक्कादायक म्हणजे यातील 400 शेतकऱ्यांनी पावसाळ्यात म्हणजेच पीकं उगवण्याच्या हंगामात जीवन संपवलं आहे . सरकारकडून अनेक उपाययोजना करूनही मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे . शेतकरी आत्महत्या रोखण्याचे ध्येय घेऊन सत्ता स्थापन करणाऱ्या शिंदे - फडणवीस सरकारच्या काळात मराठवाड्यातील 292 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
Sponsored
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं