कन्नड तालुक्यात पहिल्यांदाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी ( दि . १७ ) ऊस परिषद होणार आहे . या ऊस परिषदेत राज्यभरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते , कार्यकर्ते , ऊस उत्पादक शेतकरी ऊस प्रश्नांचे अभ्यासक सहभागी होणार असल्याची माहिती कृषिभूषण भाऊसाहेब थोरात यांनी दिली . कोल्हापूरच्या ऊस परिषदेच्या धर्तिवर यावर्षी प्रथमच कन्नड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ही ऊस परिषद डॉ . प्रकाश पोपळे , प्रदेशाध्यक्ष प्रा . संदीप जगताप , नेते रविकांत तुपकर , मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे पाटील , युवती आघाडी प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे , जिल्हाध्यक्ष मुक्ताराम गव्हाणे , तालुकाध्यक्ष प्रकाश बोरसे , कृष्णा साबळे , प्रवक्ते डॉ . शिवाजी माउली मुळे , दुर्गेस राठोड , यादवराव कांबळे यांच्या नेतृत्वात होत आहे . संघटनेचे पदाधिकारी तालुक्यातील गावागावात जाऊन बैठका घेत आहेत . मराठवाड्यातील ऊस उत्पादक खामगाव येथे ' प्रश्न ऊसाचा , जागर एफआरपीचा थोरात , कृष्णा साबळे आदी . छाया : संतोष निकम . या ची जनजागृती करताना कृषि भूषण भाऊसाहेब शेतकऱ्यांसाठी ही परिषद निर्णायक ठरणार आहे शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी या ऊस परिषदेला ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे , असे आवाहन भाऊसाहेब थोरात , प्रकाश बोरसे , दिनकर पवार , शरद मोहिते , चंद्रकांत देशमुख जगदीश नलावडे , रामेश्वर जाधव , गजानन दाभाडे , प्रकाश शहरवाले यांनी केले आहे