कोळीबोडखा येथे गेल्या आडीच वर्षात एकही ग्रामसभा भरली नाही

"सरपंच 'पती'चा मनमानी करत भरवतात ग्रामसभा भरते हाँटेलवर"

पाचोड(विजय चिडे) शासकीय नियमानुसार गावातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी व विविध विकास योजना राबविण्यासाठी ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. परंतु, कोळीबोडखा ता.पैठण येथे गेल्या अडीच वर्षांपासून कसल्याही प्रकारे ग्रामसभा घेत नसल्याने सरपंचांच्या मनमानी कारभार करत ग्रामसभा चक्क चहाच्या हाँटेलवरच भरत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

एक वर्षाभरामध्ये 6 ग्रामसभा ग्रामसभेचा अध्यक्ष हा सरपंचच असतो एकूण सहा ग्रामसभा होतात यातील चार ग्रामसभा वित्तीय वर्षातील पहिली ग्रामसभा एप्रिल, मेमध्ये, दुसरी ग्रामसभा 15 ऑगस्ट (स्वातंत्र दिनी) तिसरी ग्रामसभा ऑक्‍टोबर मध्ये, आणि चौथी ग्रामसभा 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन) अशा चार सभा होत होत्या. उर्वरित दोन ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या सोयीनुसार घेतल्या जात होत्या.

दोन ग्रामसभेमध्ये तीन महिन्यापेक्षा जास्त अंतर असू नये याची दक्षता घेतली जाते. या ग्रामसभेत शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना देऊन त्या योजना ग्रामस्थांच्या सोयी-गैरसोयीनुसार ठराव करून घेणे, हे प्रामुख्याने ग्रामसेवकांचे काम आहे.तसेच ग्रामपंचायत अधिकारातील विविध अन्य ग्रामसभा मागे-पुढे सोयीनुसार घेता येतात. मात्र कोळीबोडखा ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच आणि ग्रामसेविका यांनी मनमानी करत ग्रामसभा या फक्त कागदोपत्री आहेत असून प्रस्थरित्या ग्रामसभा घेतच नाही असे गावकऱ्यांचे म्हणे आहेत. 

चौकट- कोळी बोडखा ता.पैठण येथील ग्रामपंचायत मध्ये नियमाप्रमाणे ग्रामसभा झालेल्या नाहीत तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकाही झालेल्या नसून सदरील ग्रामपंचायत मध्ये सरपंचाच्या पतीचा हस्तक्षेप असून महिला सरपंच कोणत्याही शासकीय कार्यक्रमास तसेच 17 सप्टेंबर च्या मराठवाडा मुक्ती संग्रामास व दोन ऑक्टोबर च्या महात्मा महात्मा गांधी जयंती ला हजर नव्हत्या ग्रामपंचायत मध्ये पतिराज असून कोणतीही शासकीय काम ग्रामस्थांचे दैनंदिन कामासाठी ग्रामसेवक ही हजर राहत नाही. त्याविरुद्ध संबंधित न्यायालयात सरपंचविरुद्ध न्यायालयात प्रकरण दाखल आहे.

तीर्थराज एस.चावरे पाटील-वकील.