साखर झोपेत असलेल्या पत्नी अन् मुलावर कुर्हाडीचे सपासप वार करुन त्यांची निर्घुनपणे हत्त्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील मंजरत जवळील काळे वस्तीवर आज पहाटे घडील. आरोपीने स्वत: आपण पत्नी अन् मुलाची कुर्हाडीचे घाव घालून हात्या केली असल्याची माहिती माजलगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी पहाटे घटनास्थळी जावून पंचनामा केला. आरोपीला घटनास्थळावरुन पोलिसांनी ताब्यात घेतले. पत्नी आणि मुलाला तीच्या चुलत्याने कालच सासरी आणून सोडले होते.
मंजरथ पासून जवळच असलेल्या काळे वस्तीवर वास्तव्यास असलेले पांडुरंग शिवाजी दोडतले (वय 25 वर्षे) रा. मंजरथ ाचा व लक्ष्मी शिरू शेंडगे रा. लामेवाडी ता. माजलगाव ांचा मागील पाच ते सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना तीन मुले आहेत. पांडुरंग दोडतले हा लक्ष्मी ांना तुझ माहेराहून ट्रॅक्टर साठी पैसे आण म्हणून सतत मानसिक, शारीरिक छळ करत असे. कालच लक्ष्मीला तिच्या चुलत्यांनी सासरी आणून सोडले होते. मंगळवारी लक्ष्मी व मुलगा पिल्या (पान 7 वर)
हा झोपेत असतानाच पांडुरंग ने त्यांच्यावर कुर्हाडीने घाव घालून त्यांची हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नी व मुलाची हत्या केल्यानंतर पांडुरंग दोडतले याने ग्रामीण पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पहाटेच तीन वाजता माजलगावचे ठाणेप्रमुख खटकह, सपोनी विधाटे, बोडके, पीएसआय बोडके, दाभाडे, बळवंते, कर्मचारी मीसाळ, संजय राठोड, प्रधान, विलास खराडे, सांगळे यांनी घटनास्थळी धाव देऊन आरोपी पांडुरंग दोडतले याला अटक केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.