सोशल मीडियाचा योग्य वापर करून अस्तित्व कलामंचने नवदुर्गा साडी अर्पण सोहळ्यासाठी लोकांकडे एक प्रकारचा नवरात्रामध्ये जोगवा मागितला आणि लोकांनी भरभरून त्यांच्या पदरामध्ये हे दान टाकले. अस्तित्व कला मंच कडे जवळपास 3000 साडी जमा झाल्या .या साड्या समाजातील वंचित घटक, रोडवरील जोगवा मागणारे महिला, कचरावेचक महिला, तृतीयपंथी महिला, आदिवासी महिला घरकाम करणाऱ्या महिला, भिक्षेकरी महिला ,देवदासी महिला, पोतराज महिला आणि वृद्धाश्रमातील महिला अशा नवदुर्गांना साडी अर्पण करून हा महोत्सव साजरा करण्यात आला. या उपक्रमाची संकल्पना योगेश गोंधळे यांची असून ते गेली तीन वर्ष ही संकल्पना राबवत आहेत.नवदुर्गा साडी अर्पण महोत्सव करता यावर्षी संपूर्ण महाराष्ट्र मधून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रातील ,सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या उपक्रमासाठी आव्हान केले.याकरता आनंदी वास्तू व आनंद पिंपळकर यांचे सहकार्य लाभले. या महोत्सव करता कला मंच च्या वतीने आपल्या घरातील ज्या लग्नातील देण्याघेण्याच्या साड्या आहेत त्या अस्तित्व कला मंच कडे द्या व ते आम्ही गरजूंपर्यंत पोहोचू असे आवाहन त्यांच्यातर्फे करण्यात आले होते. नवरात्राच्या पहिले माळेपासून ते नव्या माळेपर्यंत अस्तित्व कलामांचे सर्व कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वाड्या वस्ती वर जाऊन साडी वाटप स्वतः केले. त्याचप्रमाणे या उपक्रमाची दखल बाकीच्याही काही लोकांनी घेत अशा पद्धतीचे उपक्रम आपापल्या भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शहरांमध्ये राबवले यामध्ये मुंबई,श्रीरामपूर,नाशिक ,बेळगाव , सोलापूर ,कोकण ,रत्नागिरी चिपळूण, जालना अशा अनेक शहरांमध्ये हा उपक्रम राबवला गेला. हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता डॉ. अश्विनी शेंडे, श्रुतिका चौधरी, अश्विनी सुपेकर, नीता तारु ,लक्ष्मी घुले, स्नेहल बोलकर हेमांगी ठाकूर, पल्लवी धुरू, नेहा रतनजनकर, कीर्ती देव, वैशाली वाघमारे , सोनाली मुसळे,नेहा वाले,डॉ.अमृता खामकर, क्रांती चटके,धनश्री कुलकर्णी,माधुरी फुलपगर , मोनल हिंगने,श्रीदेवी पांचाळ,वैशाली चव्हाण,सुनीता पाटील ,वैशाली पाटील,श्रद्धा राठी ,अलका गुंजाळ, अनिता कावरे,यांचे तसेच सहयाद्री फाउंडेशन,युग फाउंडेशन व पोलीस मित्र संघटना यांचे सहकार्य लाभले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
પાટણની પી.પી.જી. એકસપેરીમેન્ટલ હાઇસ્કૂલમાં 36 મી નેશનલ રમતોત્સવ અંતર્ગત એકટીવેશન કાર્યક્ર્મ યોજાયો.
પાટણની પી.પી.જી. એકસપેરીમેન્ટલ હાઇસ્કૂલમાં 36 મી નેશનલ રમતોત્સવ અંતર્ગત એકટીવેશન કાર્યક્ર્મ...
ખંભાતના રેલવે સ્ટેશનથી કોલેજને જોડતો માર્ગ ઉભરાતી ગટરના ગંદા પાણીમાં ગરકાવ ! વારંવાર રજૂઆતો છતાંય તંત્ર કુંભકર્ણ નિંદ્રામાં મસ્ત !
ખંભાતના રેલ્વે સ્ટેશન તરફથી કોલેજ તરફ જવાના માર્ગ પર ખંભાત ગ્રામ્ય પોલીસ મથકના વળાંક પાસે છેલ્લા...
'दूसरे मंत्रालयों के बोझ में दबे हैं रेल मंत्री', कपिल सिब्बल ने ओडिशा हादसे पर केंद्र सरकार को घेरा
नई दिल्ली, Odisha Train Accident राज्यसभा सांसद कपिल सिब्बल ने ओडिशा में रेल हादसे को...
মাজুলী ৰাসৰ কংসালয়ৰ এক দৃশ্য
মাজুলী ৰাসৰ কংসালয়ৰ এক দৃশ্য
કાંકરેજ તાલુકાના વડા ખાતે જોગમૈયા લાયબ્રેરીનું ઉદઘાટન કરવામાં આવ્યું #newsgujarati
કાંકરેજ તાલુકાના વડા ખાતે જોગમૈયા લાયબ્રેરીનું ઉદઘાટન કરવામાં આવ્યું #newsgujarati