भाजी खरेदी करण्याचा बहाणा करून भाजी विक्रेत्याच्या बँक खात्यातून अज्ञातांनी ८२ हजार रुपये लंपास केले . विशाल तुकाराम गंगतिरे व त्यांचा भाऊ चेतन गंगतिरे भाजी विक्री करतात . त्यासाठी ते फोन पेचा वापर करतात . जुलै महिन्यात चेतनला अज्ञाताने कॉल केला . मी चिकलठाणा विमानतळ येथून जवान बोलत आहे . आमच्या कँटीनमध्ये कार्यक्रम असल्याने मला भाज्यांसाठी ऑर्डर द्यायची असल्याचे सांगितले . त्याने जवळपास १८ हजार रुपयांच्या भाज्यांची ऑर्डर केली . त्यानंतर त्याने फोनपेवर पैसे पाठवण्यासाठी आधी तुम्ही मला काही रक्कम पाठवा , मी लगेच त्यावर पाठवतो असे सांगितले . त्यासाठी स्कॅन कोड पाठवला . चेतन यांनी त्यावर स्कॅन करताच आधी १० हजार , नंतर ९ हजार ९९९ , असे पाच टप्प्यांमध्ये ८३ हजार रुपये बँक खात्यातून वळते झाले . आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली . त्यानंतर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला