औरगाबाद : सिडकोतील प्रियदर्शिनी उद्यानातील १७ एकर जागेत स्मारक व स्मृतिवन उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे . स्मारक व स्मृतिवनच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी २५ कोटींच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली होती . यातून स्मारकाच्या म्युझियमचे बांधकाम , संरक्षण भिंत , पुतळा आणि चबुतरा उभारण्याचे काम केले जात आहे . दिवगंत बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा आणि स्मारकाच्या म्युझियमचे काम करण्यासाठी शासनाने सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी देत ९ .७० कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली . प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय जून २०२२ मध्ये काढला . त्यानुसार मनपा प्रशासनाने उर्वरित कामे करण्यासाठी प्रशासक डॉ . अभिजित चौधरी यांच्या आदेशावरून निविदा प्रसिद्ध केली होती . ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या निविदा उघडल्या असता , दिल्ली येथील आर्टिफिशियल संस्थेची एकच निविदा आली . ही निविदा अंतिम केली असून सुरुवातीपासून याच संस्थेमार्फत शिवसेनाप्रमुखांचे स्मारक व स्मृतिवनाचे काम केले जात आहे . त्यामुळे ही संस्था स्मारकाचे अंतर्गत काम , लायटिंग म्युझियममध्ये लागणारे साहित्य व उपकरणे आदी कामे केली जाणार असल्याचे पानझडे यांनी सांगितले .