सोसायटीच्या बैठकीत वीज बिल जास्त का आले, याची विचारणा केल्याने झालेल्या वादात माजी नगरसेविकेचा मुलगा व बांधकाम व्यावसायिक याने मारहाण केली. त्यात नागरिकाचे नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले.
याबाबत पंकज दीपक जाधव (वय ३३, रा. माउली रेसिडेन्सी, कर्वेनगर) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी समीर दुधाने यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कर्वेनगर मधील माउली रेसिडेन्सीमध्ये शनिवारी दुपारी चार वाजता घडली.
माउली रेसिडेन्सीमध्ये सोसायटीची बैठक होती. त्या फिर्यादी व फिर्यादीचे वडील यांनी बांधकाम व्यावसायिक समीर दुधाने यांना वीज बिल जास्त का आले, अशी विचारणा केली. तो राग मनात धरुन समीर दुधाने यांनी फिर्यादी यांच्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीच्या तोंडावर लाथ मारल्याने त्यात त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले.