रत्नागिरी : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जिल्ह्यातील वाहनधारकांना जिल्हा वाहतूक शाखेने दणका दिला आहे. सप्टेंबर २०२२ या एका महिन्यात विविध हेडखाली कारवाई करून २ हजार ९९४ वाहधारकांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ४३ लाख ४२ हजार ५० रुपये दंड वसूल केला आहे. या कारवाईत सर्वात जास्त चिपळूण आणि रत्नागिरी शहरातील वाहनधारकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

वाहनधारकांना शिस्त लागावी यासाठी जिल्हा वाहतूक शाखा काम करत आहे. या शाखेचा पदभार नुकताच सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्ता शेळके यांनी घेतला. त्यानंतर वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले. सप्टेंबर २०२२ या एक महिन्यात जिल्हा वाहतूक शाखेने नियम धाब्यावर ठेवणाऱ्या वाहनधारकांनी चांगलाच दणका दिला. त्यांच्यावर कारवाई करून शिस्त लावण्याच्यादृष्टीने समज दिली. सर्वांत जास्त अवैध प्रवासी वाहतुकीवर त्यांनी कारवाई करून या बेकायदेशीर वाहतुकीला चाप लावण्याचा प्रयत्न केला. तरी काही वाहनधारक नियमांची पायमल्ली करतात. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. लायसन नसणे, आरसा नसणे, सीटबेल्ट न लावणे, विनाहेल्मेट दुचाकी चालवणे, मोबाईलवर बोलणे, वनवे मध्ये शिरणे, वेगात वाहन चालवणे आदी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक शाखेने जिल्ह्यातील २ हजार ९९४ वाहनधारकांवर कारवाई करून ४३ लाख ४२ हजार रुपयाचा दंड वसूल केला. जिल्ह्यात सर्वांत जास्त चिपळूण शहरातील ८१६ वाहनधारकांवर ४ लाख ३८ लाख दंड वसूल केला तर त्या खालोखाल रत्नागिरी शहरातील ५३५ वाहनधारकांना ३ लाख ३६ हजार ५०० रुपये एवढा दंड केला आहे.