मेडिकल महाविद्यालयाच्या वतीने "मोफत महिला स्वास्थ्य शिबिराचे" आयोजन.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
बीड (प्रतिनिधी) बदलत्या जीवनशैलीमुळे बहुतांश लोकांना मानसिक तणावाला सामोरे जाव लागत.आज शारीरिक आरोग्या सोबतच मानसिक आरोग्याचे ही महत्व वाढले असून १० ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून सबंध जगात साजरा केला जातो.यावर्षी "सर्वांसाठी मानसिक आरोग्य आणि तंदुरुस्तीला जागतिक प्राधान्य" या प्रमुख थीम वरती जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा होत असल्याची माहिती डॉ. सुदाम मोगले यांनी दिली .
बहिरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व सौ के एस के महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय मोफत महिला स्वास्थ्य शिबिराचं आयोजन दि १० ऑगस्ट सोमवार रोजी करण्यात आले. या शिबिरामध्ये महिलांचे आरोग्य व रक्तगट तपासणी तसेच मानसिक आरोग्याबाबतही जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. पुढे बोलताना डॉ. मोगले म्हणाले की,
रोजच्या धावपळीच्या युगात मानसिक तणाव हा सर्वसामान्य झालेला असून व्यक्तींच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष झाले तर डिप्रेशन,एनजायटी पासून हिस्टेरिया डिमेन्शिया, फोबिया सारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या होऊ शकतात.यावर वेळीच अशा वेगवेगळ्या जनजागृती शिबिरांच्या माध्यमातून व तज्ञांच्या मदतीने मात करता येऊ शकते. तसेच दैनंदिन जीवनात योगा,प्राणायाम व स्वतःमध्ये सकारात्मक बदल करून आनंदी जीवन जगणे हेच तणावमुक्त जीवनाचे रहस्य असल्याचेही त्यांनी म्हटले.
या शिबिराचे आयोजन सोनाजी क्षीरसागर होमिओपॅथिक महाविद्यालयातील मटेरिया मेडिका विभागाच्या विभागप्रमुख डाॅ.रत्ना क्षीरसागर, युजी विभागप्रमुख डॉ.शेख नासेर डॉ संगीता दिबनाथ, के एस के महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ.अनिता शिंदे महिला कक्ष प्रमुख डॉ.माया खांदार,डॉ.संध्या जोगदंड,. यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ बाबुळगावकर मॅडम, प्राध्यापिका गुळवे ,श्रीमती एस एस कांबळे,ओव्हाळ मॅडम,रोहिते मॅडम ,शेख सर यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मंजू जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ अनिता शिंदे यांनी मानले.