महिलेचा डीपी असलेल्या व्हॉटसअप वरुन चॅटींग करुन त्याचा न्यूड व्हिडिओ बनवून तो अपलोड करण्याची भिती दाखवून तरुणाला ब्लॅक मेल केले जात होते. या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. अमोल राजू गायकवाड (वय २२ वर्षे, रा. तानाजी नगर, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
अमोल गायकवाड हा आयटीआय झाला होता. त्याला एका अनोळखी महिलेचा डीपी असलेला व्हॉटसॲप आला. त्याने त्याला प्रतिउत्तर दिल्यानंतर त्यांच्यात चॅटींग सुरु झाले. चॅटींग करुन त्याचा न्यूड व्हिडिओ बनविला गेला. तो अपलोड करण्याची भिती दाखवून त्याच्याकडे पैशांची मागणी केली गेली. त्यांच्याकडून वेळोवेळी ४ हजार ५०० रुपये फोन पे वरुन घेतले. या मानसिक त्रासाला कंटाळून अमोल याने “मै सुसाईड कर रहा हु" असा मेसेज नमूद करुन तो मोबाईल धारकास पाठविला. तेव्हा त्याने "करो मै व्हिडिओ ऑनलाइन करता हुं" असे म्हणून सतत पैशांची मागणी केली. त्यामुळे ३० सप्टेबर रोजी दुपारी अमोल याने राहत्या घरी आत्महत्या केली.