परळी / प्रतिनिधी

 श्री संत गुरुवर्य ह. भ. प. सोपान काका महाराज उखळीकर यांच्या 75 व्या अमृत महोत्सव पुण्यतिथी व किर्तन सोहळ्याचे (दि. 27 ते 29 ऑक्टोबर )असे तीन दिवस आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी या अमृत महोत्सव कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आव्हान उखळीकर फडाच्या वतीने करण्यात आले आहे.

येथील श्री संत सोपान काका मंदिर येथे गुरुवार दिनांक 27, 28, 29 ऑक्टोबर रोजी श्री संत गुरुवर्य ह. भ. प. सोपान काका महाराज यांच्या समाधी सोहळ्यास 75 वर्षे पूर्ण होत असल्याने अमृत महोत्सव कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवस चालणाऱ्या अमृत महोत्सव कार्यक्रमात प्रसिद्ध कीर्तनकार व भागवताचार्य यांच्या कीर्तनाचे व भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या तिन्ही दिवस अन्नदात्यांकडून प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परळी पंचक्रोशीतील भाविकांनी या तीन दिवस चालणाऱ्या अमृत महोत्सव कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संत सोपान काका महाराज उखळीकर यांच्या फळाचे मुख्यचारी ह भ प केशव महाराज उखळीकर, ह भ प विठ्ठल महाराज उखळीकर, ह भ प विश्वंभर महाराज उखळीकर, आणि ह भ प दीनानाथ महाराज उखळीकर यांनी केले आहे.