भर पावसाळ्यात हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट

"पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथील नागरिक तब्बल महिन्याभरापासून पाण्याविना"

पाचोड(विजय चिडे) यंदा सर्वत्र पावसाळा जोरात असल्याने कोळीबाडखा ता.पैठण गावाला चौफेर पाण्याने वेढले आहे. नजर जाईल तिथं पाणीच पाणी दिसेल.मात्र, गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी नाही, अशी अवस्था येथील ग्रामपंचायात ढिसाळ कारभारामुळे गावकऱ्यांची झालेली आहे. गावात महिनाभरापासून पाणी सोडलेले नाही गावातील नागरिकांना पावसांने पाणी साचून असलेल्या पाण्यावर आपली तहान भागवित आहेत.

मात्र,पाण्यावर दिवस निघणार आहे असा प्रश्न गावकरी करीत आहे.भरपावसाळ्यात ग्रामपंचायत मनमानी कारभरामुळे कोळीबोडखा ता.पैठण करण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भंटकती करावी लागत असून मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. सध्या सर्व भागात मुसळधार पाऊस कोसळत असतानाही कोळीबाडखा येथे पाणीटंचाईचे संकट आहे. इथल्या महिलांना हंडाभर पाण्यासाठी रानावनात पायपीट करावी लागते आहे.कोळीबोडखा ता.पैठण हे तीन हजार लोक संख्यांचे गाव असून याठिकाणी महीला सरपंच आहे.मात्र गावगाडा सरपंच पती हाकलत असल्याचे गावकऱ्यांतून बोले जात आहे. 

गावात लाखो रूपये खर्च करून पाणीपुरवठा योजना राबवून देखील गावकरी तहानलेली आहे. गावातील नागरिकांनी सरपंचाकडे वेळी पाणीसोडण्यांची मागणी केलेली आहे.मात्र सरपंच या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असून गावात पाणी देण्याचा प्रयत्न करत नसल्याचे आरोप केला जात आहे. गावकऱ्यांच्या नळा पाणी भेटावे म्हणून शासनाने कोळीबोडख्यात लाखो रुपये खर्च करुन पाणी टाकी उभारली तसेच एक विहिर खोदले आहे.मात्र पैसे पाण्यात गेले आहेत.

गावातील विहिरी,बोरवेलला मोठ्या प्रमाणात पाणी असूनही गावकऱ्यांची पाण्यासाठी फजिती होत आहे.मागील काही महिन्यापूर्वी कोळीबोडखा परिसरात या वर्षीही चांगला पाऊस झाला, चांगला पाऊस झाल्याने या परिसरातील पिके अक्षरशः पाण्यात गेली, शेतीचे नुकसान झाले. मात्र पावसाळा असतानाच पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गावातील कोणी बोरलेव चालू केला कि रात्री जेव्हा पाणी येईल तेव्हा धावपळ करावी लागते. किमान नाहीतर गावालगत असणाऱ्या विहीरीवरून पाणी शेंदून हंडाभर पाण्यासाठी आणावी लागत असल्यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

चौकट--गावात विचारावे तरी कोणाला..

गावात सरपंच महिला पण गावाचा कारभार दुसरेच संभाळत असतात गावात पाणी येत नाही असे कोणाला सांगावे तरी कोणाला आम्ही गावकऱ्यांनी कोणा ला बोलावे की विना पाण्याचेच राहावे का ? गावात किमान तीन दिवसआड तरी सोडण्यात येवे अशी मागणी ग्रामस्थाकांकडून होत आहे.

रियाज शेख,(ग्रामस्थक-कोळीबोडखा)

चौकट-सध्या शेतात कापूस वेचणी सुरू आहे.मात्र पाणी राहत नसल्यामुळे पाण्यासाठी रोजंदारी बुडवावी लागते. गावातील अनेक नागरिकांकडे कुठलेच वाहन नाही.गावा जवळच्या विहीरीवरून पाणी शेंदूण आणावे लागत आहे.विहीरीवर कोणाचा तरी जीव गेल्यावर मगच प्रशासनाला जाग येईल का? असा प्रश्न अनेक महिलांनी केला आहे.घरात पाणी नसल्याने कोणत्याच कामात चित्त लागत नाही. दिवसभर पाण्याचाच विचार असतो. पाण्यासाठी महिलांचेच जास्त हाल होत असतात. एवढी गंभीर समस्या निर्माण झालेली असताना आमची पाण्याची समस्या कोणीच सोडवत नाही

शारदा हातगळे,(महीला-कोळीबोडखा)

चौकट-ग्रामसेवक नाँट ट्रिचबल.

महिनाभरापासून गावात पाणी सोडले जात नाही यासाठी कोळीबोडख्याच्या ग्रामसेवकांना पाणी का ? सोडले जात नाही.या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी दुपारीच्या वेळी दुरव्धनीवरून संपर्क साधला आसता नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर दाखवला असल्याने प्रतिक्रिया भेटू शकली नाही.

(संग्राहीत फोटो)