चौसाळा दि.8 - भविष्य काळामध्ये मुलांमध्ये वेगवेगळी कौशल्येविकसीत होण्यासाठी पालकांनी मुलांना संधी निर्माण केल्या पाहिजेत. येणाराकाळ खूप स्पर्धेचा असल्याने त्या मध्ये मुलांचा निभाव लागण्यासाठी पालकांनी वेळीच लक्ष द्यावे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागरयांनी केले.
कला व विज्ञान महाविद्यालय चौसाळा येथे आयोजित माजी विध्यार्थी व पालकमेळाव्यात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्ष विठ्ठ्ल शिंदे, श्रीमती महानंदा मिटकरी, संभाजी चव्हाण उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.दीपा क्षीरसागर म्हणाल्या की, माजी विद्यार्थ्यानी महाविद्यालयातील विविध उपक्रमामध्ये सहभाग नोंदवावा माजी विद्यार्थ्याच्या योगदानातूनच महाविद्यालयाचा विकास होणार आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या जडणघडणीकडे विशेष लक्ष्य द्यावे जेणे करून तो एक सुजाण नागरिक तयार होईल. मुलांमध्ये विनम्रशिलता, परिश्रम घेण्याची तयारी निर्माण करण्यासाठी पालकांचे योगदान महत्वाचे आहे. याप्रसंगी कु.प्रतीक्षा जाधव या विध्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी महिला कक्ष व गृहशास्त्र विभागतर्फे टाकाऊ पासून टिकाऊ हस्त कला प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ.दीपा क्षीरसागर यांनी केले.
विध्यार्थिनीनी सुरेख वस्तू तयार केल्या होत्या. या प्रदर्शनासाठी प्रा.सय्य्द शाहीन, प्रा.नावेकर, प्रा.पवार यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुधीर माने यांनी केले.
तर प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ.विलास भिलारे, उपप्राचार्य प्रा.धावल्शांख यांनी केले शेवटी आभार डॉ.काकासाहेब पोकळे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी प्रा.संजय कदम, डॉ.सोमनाथ लांडगे, डॉ.लालासाहेब घुमरे, डॉ.हिरवे, प्रा.गिराम, प्रा.काशीद, प्रा.नामदेव कळसकर यांच्यासह सर्व प्राध्यापक, पालक, आजी-माजी विध्यार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते.