अलिबाग तालुक्यातील अलिबाग रेवस रस्त्यावरील चोंढी नाका येथे आज सकाळी आठ च्या सुमारास असणारे छगन मांजरेकर यांच्या दुकानांमध्ये नागींन जाती चा सर्प आला असल्याची माहिती चोंढी नाका येथे कार्यरत असलेले वाहतूक पोलीस कर्मचारी राजेश म्हात्रे यांनी सर्पमित्र अविनाश थळे, किहीम ग्रामपंचायत सदस्य पिंट्या गायकवाड यांना फोन करून छगन मांजरेकर यांच्या दुकानात नागीण आल्याची माहिती दिली असता सर्पमित्र हे तत्परतेने घटनास्थळी येऊन नागिणीला शिताफीने पकडत तिला जीवनदान दिले आहे.