केज तालुक्यात घरा समोर बसलेल्या एका विवाहित महिलेचा विनयभंग केला आहे. या प्रकरणी आठ जणां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

केज तालुक्यातील एका गावच्या वस्तीवर राहणारी विवाहित महिला ही दि. ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७:३० वा. तिच्या घरा समोर बसली असता; सुनिल सुंदर केदार याने तिच्याशी झटापट करून तिचा विनयभंग केला. त्या नंतर पीडित महिलेचा पती व दीर यांनी सुनिल केदार याला जाब विचारला असता सुनिल सुंदर केदार, त्याचे वडील सुंदर ज्ञानोबा केदार आणि बाबासाहेब ज्ञानोबा केदार, बालाजी सुंदर केदार, अनिल सुंदर केदार, सिमींताबाई सुंदर केदार, संगीता बाबासाहेब केदार, हौसाबाई जग्गनाथ सांगळे यांनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवुन पीडिता व तिचा पती व दीर यांना लाथाबुक्याने चापटाने मारहाण करन मुका मार दिला. पीडितेच्या दीरास काठीने पाठीत मारुन मुका मार दिला. तसेच गळा दाबला आणि शिविगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी पीडितेने दि. ७ ऑक्टोबर रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून सुनिल केदार, ज्ञानोबा केदार, बाबासाहेब केदार, बालाजी केदार, अनिल केदार, सिमींताबाई केदार, संगीता केदार, हौसाबाई सांगळे या आठ जणांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४५१/२०२२ भा. दं. वि. ३५४ (अ), ४५२, १४३, १४७, १४८, १४९ , ३२३, ५०४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदूरघाट दूरस्थ पोलीस चौकीचे पोलीस जमादार अभिमान भालेराव हे पुढील तपास करीत आहेत.