केज :– पिकाचे वन्य प्राण्यां पासून रक्षण करण्यासाठी शेता भोवती तारेचे कुंपण लावून त्यात सोडलेल्या वीज प्रवाहचा शॉक लागून केज तालुक्यातील लाडेवडगाव येथे तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घडली आहे.

या बाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, लाडेवगाव ता. केज येथील अशोक विठ्ठल लाड वय (३६ वर्ष) हे शनिवारी दुपारी शेतात गेले होते. शेतातील पिकाचे वन्य प्राण्यां पासून संरक्षण करण्यासाठी लावलेल्या तारेच्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. याची अशोक लाड यांना कल्पना नव्हती. शेतातील काम करताना त्यांचा तारेला स्पर्श झाला आणि विद्युत प्रवाह सुरू असल्याने त्यांना करंट लागून जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार विलास तुपारे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. अशोक लाड यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे पाठविला आहे. 

शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक :-* शेतातील पिकांचे रानडुक्कर, हरीण असे वन्यप्राणी पिकांची नासधूस करत आहेत. यामुळे शेतकरी नुकसान टाळण्यासाठी पिकांच्या भोवती तारेचे कुंपण लावून त्यात विद्युत प्रवाह सोडतात. हे धोक्याचे आणि बेकायदेशी आहे. याची शेतकऱ्यांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.