सेनगांव ग्रामीण रुग्णालय येथे राष्ट्रीय जंत नाशक मोहिमेच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव शहरातील ग्रामीण रुग्णालय सेनगाव या ठिकाणी आज दिनांक 8 ऑक्टोंबर वार शनिवारी रोजी जंत नाशक मोहिमे संदर्भात डॉक्टर सचिन राठोड यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शाळेचे मुख्याध्यापक अंगणवाडी सेविका आशा वर्कर व आरोग्य कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे तसेच 10 ऑक्टोंबर 2022 रोज सोमवारला सर्व 1वर्ष ते 19 वर्ष वयोगटातील सर्व मुला -मुलींना जंत नाशक मोहिमेचा लाभ घेण्याचे आव्हान डॉक्टर सचिन राठोड वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय सेनगाव यांनी आज केले आहे