हडपसर पोलीस ठाणे, कडील पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, तपासपथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे व अंमलदार हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलींग करीत असताना जाधव निवास, न्हावले अपार्टमेन्ट, काळेपडळ या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक मोकळ्या जागेत वानवडी पोलीस स्टेशनकडील अंमलीपदार्थ विक्री करणारा आरोपी व एनडीपीएस गुन्हयामध्ये रेकॉर्डवरिल तडीपार आरोपी लरिन्स राजु पिल्ले वय ४२ वर्ष धंदा रा. मांजरी ग्रामपंचायत शाळेसमोर, गोपाळपट्टी सोपानपार्क प्लॅट नंबर ३०८, मांजरी ता. हवेली जि.पुणे. व त्यांचे दोन साथीदार ऋषिकेश जगदीश भोजणे वय ३२ वर्षे रा. प्लॅट नंबर ३०८, साईश्रध्दा गोपाळपट्टी मांजरी ता.हवेली जि. पुणे. मंगेश सुनिल पवार वय ३२ वर्ष रा. हर्षद अपार्टमेन्ट प्लॅट नंबर २४, ससाणेनगर हडपसर पुणे हे २ किलो ४४८ ग्रॅम गांजा ओला सुका बोंडे व फुले असलेला व १२० ग्रॅम चरस वजनाचे (चरस ) घट्ट पातळ द्रव्य काळया रंगाचे गोळे हे प्लॅस्टीक पिशव्यामध्ये पॅकिंग करीत असताना मिळुन आले आहे.
या आरोपी कडुन १ किलो ४४८ ग्रॅम गांजा आणि १२० ग्रॅम चरस, मोबाईल हॅन्डसेट, वजनकाटा, गुन्ह्याकरीता वापर केलेली होन्डा अॅक्टीवा मोपेड असा किं.रु साडोपाच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी लॉरेन्स राजु पिल्ले यास पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ ५ पुणे शहर यांनी 28 जानेवारी 2022 रोजी पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हा हददीतून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले असताना त्या आदेशाचा भंग करुन तो मुदतीपूर्वी कसलीही परवानगी न घेता पुणे शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात अंमली पदार्थाची विक्री करीत असताना मिळून आला आहे.