परभणी, दि.7 : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून अनुचित प्रकार घडू नये. याकरीता ईद-ए-मिलाद सण/उत्सव निमित्ताने रविवार दि. 09 ऑक्टोबर, 2022 रोजी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील सर्व मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या सीएल-2, सीएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष) व एफएल, बीआर-2, बिअरची सिलबंद बाटलीतून मद्य विक्रीसाठी संपूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्ती धारकाविरुध्द कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे ही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं