रत्नागिरी : पन्नास वर्षांपूर्वीची रत्नागिरी थिबा राजवाडा येथे बौध्दजन पंचायत समिती मुंबई यांनी हक्काने मिळविलेली १४ गुंठे जागा अनेक वर्षांपासून नगर परिषदेने आरक्षित केली होती. ही जागा ताब्यात घेण्यासाठी बौध्दजन पंचायत समितीने सातत्याने पाठपुरावा केला. सदरच्या जागेऐवजी नगरपरिषद रत्नागिरी यांच्याकडून कर्लेकर मळा रत्नागिरी येथील जागा अधिकृत ताब्यात घेण्यात बौध्दजन पंचायत समितीला यश आले आहे.
पंचायत समिती मुंबई यांनी १९६७ साली रत्नागिरी येथे जमीन संपादन केली होती.अनेक वर्ष ही जागा तशीच राहिल्याने रत्नागिरी नगरपरिषदेने ही जागा गार्डनसाठी आरक्षित केली होती. नगर परिषदेने आरक्षित केलेली जागा आपल्या ताब्यात घेण्यासाठी बौद्धजन पंचायत समिती मुंबई व रत्नागिरी तालुका बौध्दजन पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने लक्ष वेधले.तत्कालीन कार्यरत माजी अध्यक्ष दिवंगत हरीभाऊ आयरे, दिवंगत कृष्णा जाधव, तदनंतर तु.गो सावंत यांनी मेहनतीने पाठपुरावा केला होता. अलिकडच्या काळात बौध्दजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या माध्यमातून रत्नागिरी पंचायत समितीचे अभ्यासू व धडाडीचे अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार यांनी आपल्या पदाधिकारी यांच्यासमवेत सातत्याने पाठपुरावा केला. यामध्ये विद्यमान अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष विजय आयरे, धडाडीचे माजी अध्यक्ष तु.गो.सावंत, सचिव सुहास कांबळे, सहसचिव नरेंद्र आयरे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत यांच्या विशेष प्रयत्नाने या प्रलंबित जागेचा प्रश्न मार्गी लावण्यात आला. विशेष म्हणजे याकामी प्रकाश पवार यांनी वरिष्ठ पातळीवरून ही जागा ताब्यात घेण्यासाठी सक्षमपणे कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मोठे योगदान दिले.
बौद्धजन पंचायत समितीची ही रत्नागिरी शहरातील मोक्याची जागा मिळविण्यात यश आल्याने या कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांचे तमाम बौद्ध बांधवांनी मनापासून अभिनंदन केले. ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून या जागेची हद्द कायम करून या जागेत अधिकृतपणे बौध्दजन पंचायत समिती मुंबई अशा नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी तालुका अध्यक्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार, विजय आयरे , तु.गो.सावंत,सुहास कांबळे नरेंद्र आयरे,संजय आयरे,रविकांत पवार, कृष्णा जाधव,दिनकर कांबळे, प्रमोद पवार, शैलेश कांबळे, विलास कांबळे, गोपीनाथ जाधव सतिश कदम, संजय कदम,प्रितम आयरे , विविध गाव शाखांचे प्रमुख पदाधिकारी,महिला- पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१४ गुंठे ताब्यात घेतलेल्या जागेला पूर्ण कंपाऊंड व आवश्यक ते बांधकाम लवकरच पूर्णत्वास नेण्यासाठी आपण कार्यप्रवण असल्याचेही तालुकाध्यक्ष प्रकाश पवार यांनी यावेळी सांगितले. शेवटी सचिव सुहास कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या दिनाचे निमित्त साधून पंचशिल विलास कांबळे याची १४ वर्षांखालील गटामध्ये पुणे येथे फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तालुकाध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार आणि माजी अध्यक्ष तु.गो.सावंत यांनी समितीच्यावतीने या खेळाडूचा विशेष गौरव करून शुभेच्छा दिल्या.