त्या अल्पवयीन मुलाला पाचोड पोलिसांनी 24 तासांत सुखरूप काढले शोधून
पाचोड: पाचोड येथून एका सतरा वर्षीय परप्रांतीय युवकाला बळजबरीने कारमध्ये बसून सीनेस्टाईलने अपहरण केल्याची खळबळजनक घटना पाचोड येथील आठवडी बाजारात घडली होती.या विशेष म्हणजे अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलाला पाचोड पोलिसांनी 24 तासांत सुखरूप शोधून काढले आहे.
याविषयी अधिक माहीती अशी की,पाचोड येथील मोसंबी बाजार पेठेत मध्यप्रदेशवरून काही मजूर मोलमजुरी करण्यासाठी आले आहे.मुकेश राजाराम निगवाल (रा. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) असे सतरा वर्षीय मुलाचे नाव असून तो कामानिमित्त एकटाच पाचोडला राहतो. त्याचे रविवारी पाचोडमधून अपहरण झाल्या
याप्रकरणी मुकेश च्या साथीदाराने दिलेल्या फिर्यादीवरून पाचोड पोलिस ठाण्यात अपहरणकर्त्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी पाचोड पोलिस ठाण्यांचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे,उपनिरिक्षक सुरेश माळी,उपनिरिक्षक प्रशांत सुताळे,पोनिस नाईक पवण चव्हाण यांनी तात्काळ तपासाचे चक्रफिरवले त्यावेळी त्यांना हा मुलगा शहगड परिसरात असल्याचे सोमवारी रात्री पोलिसांना माहिती मिळाली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून या मुलाला ताब्यात घेतले परंतु अपहरणकर्ते मात्र फरार झाले होते. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यांत करण्यात आली आहे.