आम आदमी पार्टीचे कार्यकर्ता जोडो अभियान खांडे पारगाव येथून सुरुवात होणार असून भीमराव कुटे तालुकाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड यांनी आव्हान केले आहे
बीड -आम आदमी पार्टीचे सर्वे सर्वी मा. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री दिल्ली सरकार यांच्या विचाराला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी व विकासाचे राजकारण सर्वसामान्य जनते पर्यंत जाण्यासाठी आम आदमी पार्टी कार्यकर्ता जोडो अभियान ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी व कार्यकर्ते आम आदमी पार्टीचे विचार दिल्लीत होत असलेले कार्य मोफत शिक्षण मोफत आरोग्य मोफत पाणी मोफत विद्युत अशा या मूलभूत सुविधा नागरिकांपर्यंत बिना मूल्य भेटल्या पाहिजेत आणि देण्याचं काम आम आदमी पार्टीने दिल्ली व पंजाब मध्ये दिलेला आहे तेच काम महाराष्ट्रातील जनतेला का मिळू शकत नाही हा प्रश्न घेऊन आम आदमी पार्टी ग्रामीण भागातील नागरिकापर्यंत कार्यकर्ता जोडो अभियानाला सुरुवात करत आहे उद्या रविवार दि.09/10/2022 रोजी बीड तालुक्यातील खांडे पारगाव या ठिकाणाहून सुरुवात करण्यात येत आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी सैनिक अशोक येडे जिल्हा अध्यक्ष आम आदमी पार्टी तसेच उपाध्यक्ष म्हणून सचिव रामधनजी जमले शहरातील सर्व शहर कमिटी तालुक्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी संघटन मंत्री ज्ञानेश्वर राऊत, शहराध्यक्ष सय्यद सादेक, मिलिंद पाळणे, कैलास चंद पालीवाल, रामभाऊ शेरकर, तालुका उपाध्यक्ष आजम खान तालुका जिल्हा उपाध्यक्ष आश्रम शेख रामभाऊ शेरकर, युवा कार्यकर्ते मा.दत्ता सुरवसे (सर्कल प्रमुख आम आदमी पार्टी) माऊली शिंदे महादेव प्रभाळे व समस्त नागरिक यांनी उपस्थित राहावे असे आव्हान मा. भीमराव कुठे, तालुका अध्यक्ष आम आदमी पार्टी हे करत आहेत